पेलोटा वास्का शिबीर, स्पर्धेचे आयेजन

। अलिबाग । वार्ताहर ।

जम्मू काश्मीर येथील श्रीनगरमध्ये पहिल्या राष्ट्रीय पेलोटा वास्का (फ्रंटबॉल) राष्ट्रीय शिबीर व स्पर्धेचे आयोजन (दि.1) ते (दि.5) जून दरम्यान करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिरासाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक स्पेनवरून ईनाकी व अर्जेंटिनावरून मार्टिन हे प्रशिक्षणासाठी आले होते. यावेळी देशातून 18 राज्यातील एकूण 150 खेळाडूंनी सहभाग नोंदविला. यामध्ये महाराष्ट्रातील संस्कृती घरत हिने रौप्यपदक तर आरिश बावडेकर याने कांस्यपदक पटकावल आहे. यावेळी या शिबिरासाठी महाराष्ट्रातील स्वप्नील आदुरकर (ठाणे), संस्कृती घरत (रायगड), संदेश भोजकर (कोल्हापूर), यश सरनाईक (कोल्हापूर), शुभम महानकाळे (कोल्हापूर), आरिष बावडेकर (सातारा), साहिल गुर्जर (सातारा), विनायक चोथे (पुणे), कुणाल भुसारे (ठाणे), दिशांत भोईर (ठाणे), हर्ष साळुंखे (पुणे) अशा 12 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. पेलोटा वास्का या खेळाला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेची मान्यता असून भारतामधे प्रथमच या खेळाचे शिबिर व स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. यावेळी खेळाडूंना राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष मोहम्मद इक्बाल व उपाध्यक्ष महेश राठोड यांचे मार्गदर्शन लाभले.

Exit mobile version