। पेण । प्रतिनिधी ।
पेण शहरातील मुख्य रस्त्यावरील सनसिटी इमारतीमध्ये असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या एटीएमवर 17 जानेवारी रोजी पहाटे दरोडा टाकून दरोडेखोरांनी 56 लाख रुपये लंपास करुन पोलिसांना समोर आवाहन उभे केले होते. परंतु, या प्रकरणात तब्बल 11 महिन्यांनंतर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दोन आरोपींना गजाआड केले असून, त्यांना पेण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 12 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
याबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले की, या गुन्ह्यातील दोन आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहेत. मात्र, इतरही आरोपी पकडणे गरजेचे आहे. तसेच चोरीतील रक्कमदेखील रिकर्व्हर करणे आहे. त्यामुळे आरोपींची नावे देणे योग्य नाही. त्यामुळे सर्व आरोपी हाती येताच पत्रकार परिषद घेऊन प्रसार माध्यमांना सर्व माहिती दिली जाईल.