पेण कोमसापचे जिल्हास्तरीय काव्यसंमेलन

। पेण । प्रतिनिधी ।

कोकण मराठी साहित्य परिषद पेण शाखा आयोजित जिल्हास्तरीय काव्यसंमेलन गांधी वाचनालय पेण येथे संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य ए.डी.पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी रायगडभूषण प्रा. एल. बी. पाटील होते. कार्यक्रमाला अ.भा.आगरी संस्थेचे अध्यक्ष कवी सूर्यकांत म्हात्रे, एल् डी म्हात्रे, रामदास मोकल,कवी अशोक जैन,के.पी. पाटील, मधुबनकट्टयाचे भ.पो. म्हात्रे, चंद्रकांत पाटील इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. स्वागताध्यक्ष लवेंद्र मोकल यांनी स्वागत केले तर एस.एस.पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल पाटील यांनी केले. राजकारण, अर्थकारण, समाजकारण, भ्रष्टाचार, महागाई इत्यादी विषयांवर दर्जेदार कविता सादर केल्या गेल्या. मोहन पाटील, ना.ज.म्हात्रे, अँड.प्रकाश ठाकूर, भगवान म्हात्रे, सदानंद ठाकूर, मोहनलाल म्हात्रे, सविता पाटील, रामचंद्र म्हात्रे, रमेश पाटील, देवाजी पाटील, हिरामण पाटील इत्यादी 41 कवींनी श्रोत्यांना आनंद दिला.

Exit mobile version