| पेण | प्रतिनिधी |
पेण कृषी उत्पन्न बाजार समितीवर आज पर्यंत शेतकरी कामगार पक्षाचा निविर्वाद वर्चस्व राहिले आहे. यावेळीही शेकापतर्फे रायगड मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा ज्येष्ठ शेकाप नेते पी.डी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली जाणार आहे. सोमवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी 54 उमेदवारी अर्ज आले असून, यामध्ये सहकारी संस्था एकूण 11 सदस्य, सर्व साधारण 7, महिला 2, इतर मागासवर्ग 1, विमुक्त जाती जमाती (भटक्या)1. यामध्ये 24 सहकारी संस्था असून त्यामध्ये एकूण मत 367 आहेत या विभागामध्ये 32 उमेदवारी अर्ज आलेले आहेत. यामध्ये उचेडे,कणे, करोटी, कामार्ली, कोप्रोली, कांदळे, खातशेत , गडब, जिते, जोहे, तरणखोप, निधवळी, पाबळ, भवानीदेवी वाशी, भाल, मसद बुद्रुक, मोठे भाल, वढाव, वरसई, वाक्रुळ, वाशीग्रुप, विठ्ठलनगर (मिश्र), शिर्की ग्राम, हमरापूर असे असून ग्रामपंचायतीसाठी प्रतिनिधी मधून 4 यामध्ये सर्व साधारण 2, अनुसुचित जाती जमाती 1, आर्थिक दृष्टया दुर्बल घटक 1 या विभागामध्ये एकूण 63 ग्रामपंचायतीच्या 625 मतदान आहे. या विभागात 13 उमदेवारी अर्ज आलेले आहेत. अडते व्यापारी मध्ये 2 प्रतिनिधी असून एकूण मतदान 317 आहे. या विभागात एकूण 6 उमेदवारी अर्ज आलेले आहेत. तर हमाल व तोलारी मध्ये 1 प्रतिनिधी असून यामध्ये एकूण 52 मतदार आहेत. या विभागासाठी 3 उमेदवारी अर्ज आलेले आहेत.
उमेदवारी अर्जाची छाननी 5 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता निवडणूक कार्यालयात होईल. 6 एप्रिल रोजी उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाईल. तसेच 11 ते 3 च्या दरम्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ असेल. अंतिम यादी प्रसिध्दी 21 एप्रिल 2023 रोजी करण्यात येईल. निशाणीचे वाटप देखील त्याच दिवशी करण्यात येईल. मतदान 30 एप्रिल 2023 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यत. मतमोजणी त्याच दिवशी संध्याकाळी करण्यात येणार आहे.यावेळी भाजपकडून माजी आम.धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली अर्ज दाखल करण्यात आले आहे.