गटशिक्षणाधिकारी अरुणा मोरे यांचे प्रतिपादन
। हमरापूर । वार्ताहर ।
पेण तालुक्यांतील शिक्षक हे चांगले असल्याचेे गौरवोद्गार पेण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी अरुणा मोरे यांनी पेण येथे बोलताना काढले. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ तालुका अखिल पेण तालुका प्राथमिक शिक्षक संघ आयोजित शिक्षक संघ वर्धापन दिनानिमित्त गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा व सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार समारंभाचे आयोजन पेणमधील आगरी समाज सभागृहात करण्यात आले होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्य उपाध्यक्ष व कोकण विभागप्रमुख प्रमोद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष आदिनाथ पाटील, जिल्हा सरचिटणीस किशोर पाटील, जिल्हा संघटक मोहन भोईर, अमरचंद पाटील, गटशिक्षणाधिकारी अरुणा मोरे, पेण तालुका प्रशासनाधिकारी संगिता माने, जिल्हा आघाडीच्या सरिता पाटील, तालुकाध्यक्षा जयश्री सावंत, कार्याध्यक्ष विठोबा पाटील, केंद्रप्रमुख जनार्दन म्हाञे, राजेंद्र पाटील, मंदाकिनी चव्हाण, निवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रविंद्र ठाकुर, पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे सदस्य सु.का. पिंगळे, गुरुजी, अरविंद वाघमारे, कोटक बँकेचे मंगेश लिंगायत, निलेश धुमाळ आदींसह शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते यावेळी सेवानिवृत्त शिक्षक तसेच शिक्षक व शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष प्रमोद पाटील, किशोर पाटील, संगिता माने आदींनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक तालुकाध्यक्षा जयश्री सावंत यांनी तर सूत्रसंचालन विनोद म्हात्रे व राजश्री पेरवी यांनी केले.