। नागोठणे । प्रतिनिधी ।
कोकणातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारकडे सातत्याने प्रयत्न करत राहणार असल्याची ग्वाही आ.बाळाराम पाटील यांनी दिली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने रोहा तालुका शिक्षक संवाद दौरा कार्यकर्त्यांच्या समवेत रोहा जवळील महालक्ष्मी फार्म, तारेघर रोहा येथे आयोजित करण्यात आला होता. तालुका निरीक्षक मोहनशेठ कडू यांच्या निरीक्षणाखाली नुकताच संपन्न झाला.
या शिक्षक संवाद दौर्यासाठी राष्ट्रवादीचे मधुकर पाटील, विजयराव मोरे, समीर सकपाळ, विनोद पाशीलकर, समीर शेडगे, शेकाप तालुका चिटणीस राजेश सानप, ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर, आरडीसीसी संचालक गणेश मढवी आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान ही सभा सुस्थितीत पार पाडण्यासाठीआमदार बाळाराम पाटील यांचे रोहा तालुका निरीक्षक मोहनशेठ कडू यांनी विशेष मेहनत घेऊन त्यांची कामगिरी चोख पार पाडली, त्यांना नंदूशेठ म्हात्रे यांनी देखील सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नारायण पानसरे यांनी केले.