जलतरण स्पर्धेत पेणकरांचे वर्चस्व

| पेण | प्रतिनिधी |
मास्टर गेम्स फेडरेशन आयोजित पाचवी राष्ट्रीय जलतरण स्पर्धा 18 व 19 मार्च 2023 रोजी नाशिक येथील वीर सावरकर जलतरण तलाव येथे आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये विविध राज्यांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला यामध्ये केरळ, कर्नाटक, मध्य प्रदेश, आसाम, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, तामिळनाडू या राज्यांच्या सहभाग होता. या स्पर्धेत पेणमधील तीन खेळाडूंनी आपले वर्चस्व गाजवत महाराष्ट्राचे नाव उंचावले यामधील खेळाडू खालील प्रमाणे सचिन शिंगरुत- 1 सुवर्ण, 1 रजत, 1 कांस्य , संकेत म्हात्रे- 2 रजत, 1 कांस्य, मैथिली शिंदे- 1 सुवर्ण, 2 कांस्य या पुढेही पेणमधील जास्तीत जास्त खेळाडूंना प्रोत्साहित करुन स्पर्धेमध्ये भाग घ्यावा असा या खेळाडूंचा मानस आहे. पेणमधील या खेळाडूंच्या प्रशसनीय कामगिरीमुळे त्यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षावा होत आहे.

Exit mobile version