पी.डी.पाटील, निलिमा पाटील आदींचा समावेश
| पेण | प्रतिनिधी |
पेण बाजार समितीच्या निवडणुकीच्या छाननीमध्ये मातब्बर उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आल्याने निवडणूक रंगतदार वळणावर पोहोचली आहे. अर्ज बाद होण्यामध्ये शेकापचे पी.डी.पाटील, तसेच भाजप प्रणित पॅनलच्या अॅड. निलिमा पाटील यांचा समावेश आहे.
शेकापकडून पी.डी.पाटील आणि भाजप प्रणित धैर्यशील पाटील यांच्या कडून निलीमा पाटील हे बाजार समितीचे सभापतीपदाचे उमेदवार म्हणून सर्व जण पाहत असताना अचानक छाननी दरम्यात दोन्हीही मातब्बरांचे उमेदवारी अर्ज बाद झाल्याने या निवडणुकीमध्ये एक वेगळीच रंगत येणार असेच चित्र दिसत आहे. या दोघांशिवाय इतर आठ जणांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामध्ये वासूदेव पोसूराम पाटील, दत्तात्रेय सखाराम पवार, संतोष शाताराम चव्हाण, मच्छिद्र कुष्णा सवार, मनोहर हरी पारधी, गजानंन शंकर वाघमारे, मेघा तुषार मानकवळे, सुगिता नंदकुमार पाटील यांचा समावेश आहे.
वैध ठरलेल्या एकूण 44 उमेदवारांमध्ये प्रभावती प्रभाकर पाटील, प्रकाश गणा ठाकूर, मोरेश्वर काशिनाथ म्हात्रे, मोरेश्वर महादेव म्हात्रे, दीपक गजानन पाटील, प्रसाद वामन पाटील, मिलींद विठोबा पाटील, श्यामकांत कृष्णा पाटील, दिपक लक्ष्मण खाडे, राजू नारायण पाटील, शकुंतला वासुदेव पाटील, दिलीप धर्माजी ठाकुर, संदेश शंकर ठाकूर, हिरश्चंद्र वसंत पाटील, महादू सटू मानकर, जयंत यशवंत नारकर, जयप्रभा प्रफुल्ल म्हात्रे, नितीन अंबाजी पाटील, रामदास खेळया घासे, सुरेश पांडूरंग पाटील, अमोल वसंत घोटणे, शरद वसंत पाटील, शेवंती परशुराम ठाकुर, दिनानाथ रामभाऊ पाटील, मालती भगवान तांडेल, कृष्णा धाया म्हात्रे, गजानन बाळाराम म्हात्रे, रविकांत दतात्रेय म्हात्रे, महेश लक्ष्मण पाटील, जोमा राघो दरवडा, पुजा अशोक पाटील, सुधीर मारुती पाटील, सचिन नरेश पाटील, दिपीका मंगलदास ठाकुर, जयश्री गजानंन वाघमारे, विनोद दत्तात्रेय पाटील, राजेश राघवजी गाला, सुहास अनंत पाटील, सतिश चिंतामंण पाटील, अशोक गोविंद म्हात्रे, मंगल परशुराम पाटील, ज्योत्सना गजानंन पाटील, कैशल्या रमेश घरत, काशिनाथ जनार्दन पाटील हे आहेत.
आता निवडणुकीच्या 18 जागांसाठी 44 उमेदवार आहेत. यामध्ये सुधीर मारुती पाटील (ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक) व अमोल वसंत घोटणे (सहकारी कृषी वि.वि.कार्यक्रारी सेवा संस्था वि.जा.भटक्या जमाती) या दोघांची बिनविरोध निवडणूक झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात 16 जागांसाठी 42 अर्ज वैध आहेत. अर्ज मागे घेण्याची तारीख 20 एप्रिल आहे. तोपर्यत आणखी काही रंगत पहायला मिळेल असे चित्र आहे.