| पेण | प्रतिनिधी |

महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने कोल्हापुर येथे 60 वी सिनीअर महाराष्ट्र श्री 2023 स्पर्धा पार पडली. पेण तालुक्यातील वरेडी गावचे सुपुत्र प्रतिश पांडुरंग पाटील याने 85 वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवत महाराष्ट्र श्री 2023 हा किताब पटकावला.
स्पर्धेमध्ये राज्यभरातून मोठया संख्येने स्पर्धक आले होते. प्रतिशच्या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. भविष्यात बॉडी बिल्डींग स्पर्धेमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व करण्याचे त्याने ठरवले आहे.







