पंतप्रधान मोदींचा जोरदार पलटवार ; अविश्वास ठरावाला रोखठोक उत्तर
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
काँग्रेसची नीती चांगली नाही, त्यांची नियतही चांगली नाही, देशाच्या जनतेने काँग्रेसवर अविश्वास दाखवला असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. देशातल्या अनेक राज्यात काँग्रेसला जनतेने नाकारलं असल्याचं ते म्हणाले. काँग्रेसकडे स्वतःचं असं काहीच नाही, पक्ष नाही, विचार नाही, चिन्ह नाही, एवढंच काय तर मतांसाठी काँग्रेसने गांधी नावही चोरल्याची टीका पंतप्रधानांनी केली. लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलताना त्यानी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.
मोदी उवाच्च
विरोधकांना देवाने सुबुद्धी दिली आणि अविश्वास प्रस्ताव आणला, त्यांचा अविश्वास प्रस्ताव म्हणजे आमच्यासाठी शुभ संकेत. 2024 साली आम्ही विक्रमी जागांसह सत्तेत येणार. विरोधकांनी फिल्डींग आमच्यासाठी सजवली, पण चौके आणि छक्के आमच्याकडून लागले. तिकडून फक्त नो बॉल पडत राहिले. ज्यांचे स्वत: चे हिशोब बिघडलेत ते आमच्याकडून हिशोब मागत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून विरोधकांनी माझ्याविरोधात जेवढे काही अपशब्द वापरायचे तेवढे वापरले. पण ते त्यांच्यासाठी चांगलं आहे, कारण त्यांचं मन काहीसं हलकं झालं असेल. मोदी तेरी कब्र खुदेगी हा त्यांच्या आवडता नारा आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना काही गुप्त वरदान मिळालं आहे, ते लोक ज्यांचं वाईट इच्छितात त्यांचं चांगलंच होतंय. गेल्या नऊ वर्षात माझ्याविरोधात अनेक गोष्टी केल्या, पण माझं चांगलंच झालं.
गेल्या तीन दिवसांपासून या मुद्द्यावर विविध पक्षांच्या नेत्यांनी आपले मत मांडले आहे., विरोधकांनी मात्र याचं गांभीर्य पाळलं नाही. विरोधकांनी जनतेचा विश्वासघात केला असून त्यांना लोकांपेक्षा आपल्या पक्षाची जास्त चिंता आहे. विरोधकांना जनतेच्या भूकेची चिंता नाही, त्यांच्या राजकारणाची चिंता आहे.
नरेंद्र मोदी,पंतप्रधान