डेल्टा प्लस रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची प्रकृती उत्तम

अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
। अलिबाग । प्रतिनिधी ।
जिल्ह्यात करोनाच्या दुसर्‍या लाटेचे प्रमाण कमी झाले आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची तपासणी करण्यात आल्यानंतर राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा, पुणे यांनी (दि.11) दिलेल्या अहवालानुसार दोन रुग्णांना डेल्टा प्लस विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले होते.

दरम्यान, त्याचवेळी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी काही जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता, मात्र ते पूर्णतः बरे झाले असून त्यांची प्रकृतीही उत्तम आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यास जिल्हा प्रशासन सक्षम असून नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, घाबरु नये, कोव्हिड-19 संदर्भात शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे, कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास तात्काळ आरोग्य संपर्क साधावा, जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे, मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, हात वारंवार स्वच्छ धुणे या बाबींचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी केले आहे.

Exit mobile version