स्वार्थी लोकांना जनताच धडा शिकवेल

अनिल नवगणे यांचा इशारा


| म्हसळा | वार्ताहर |

माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या साधेपणाचा गैरफायदा उठवून केवळ स्वार्थासाठी आणि येऊ घातलेल्या संकटापासून वाचण्यासाठी त्यांना एकाकी सोडून गेलेल्यांना जनता धडा शिकविल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांनी दिला. उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या म्हसळ्यातील हुमना कबरस्तानच्या संरक्षक भिंतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी माजी आ. तुकाराम सुर्वे, उपजिल्हा प्रमुख नंदू शिर्के, तालुका प्रमुख सुरेश कुडेकर, माजी जि.प. सदस्य अविनाश कोळंबेकर, श्रीवर्धन तालुका प्रमुख सुजित तांदळेकर, विधानसभा क्षेत्र संघटक रवींद्र लाड, काँग्रेसचे डॉ. मुईज शेख, सुफियान हालडे, विशाल साळुंखे, अजय करंबे, अभय कलमकर, मुसद्दीक इनामदार, बाबाजान पठाण, सर्फराज वस्ता, नदीम दफेदार, शहर प्रमुख अनिकेत पानसरे आदी मान्यवर आणी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी अनिल नवगणे यांनी शिवसेनेवर विश्वास ठेऊन शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्व मुस्लिम कार्यकर्त्यांचे आभार मानून त्यांचा भविष्यात कधीही विश्वासघात होणार नाही, याची ग्वाही दिली.

Exit mobile version