| उरण | वार्ताहर |
उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांनी आपल्या दालनात प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दि.बा. पाटील यांच्या फोटोचे अनावर केले आहे. याबाबत गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे. माजी खासदार, लोकनेते दि.बा. पाटील यांनी आपल्या जीवनात स्वतःचे हित न जपता राज्यातील शेतकर्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सातत्याने एक लोकसेवक म्हणून शासनस्तरावर प्रयत्न केले. तसेच उरण, पनवेल, नवी मुंबई परिसरातील प्रकल्पग्रस्तांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. अशा लोकनेत्याचा आदर्श तालुक्यातील लोकसेवक, शासकीय अधिकारी, युवा पिढीसमोर प्रेरणादायी असावा, या उदार भावनेतून उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांनी आपल्या दालनात प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दि.बा. पाटील याचा आदर्श घालून दिला आहे.