स्पर्धा परीक्षेतील टक्का वाढला पाहिजेः निशा जाधव

| मुरुड-जंजिरा | वार्ताहर |

एसएससी व एचएससी बोर्डाच्या परिक्षेत कोकणातील गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते, परंतु स्पर्धा परिक्षेत हे प्रमाण कमी दिसते. स्पर्धा परिक्षेचे महत्व आणि त्या विषयी जागरुकता निर्माण केली, तर आयपीएस किंवा आयएएस परीक्षेत निश्चितपणे टक्का वाढेल, असे मत मुरुड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक निशा जाधव यांनी व्यक्त केले. मुरुड सार्वजनिक वाचनालय व कोमसाप मुरुड शाखा यांच्यातर्फे वाचक प्रेरणा दिना निमित्त वाचनालयाच्या वास्तुत ग्रंथ मित्र स्व. संजय भायदे अभ्यासिकेचे उद्घाटन करताना जाधव प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.

तंत्रज्ञानाच्या युगात वाचन संस्कृती कमी होऊ पहाते आहे. परंतु वाचाल, तर वाचाल हे वचन ध्यान्यात ठेवले पाहिजे. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वाचनालयात सुरु केलेल्या अभासिकेचा निश्चित लाभ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष जयवंत अंबाजी, उपाध्यक्षा दीपाली जोशी, कोमसापचे अध्यक्ष संजय गुंजाळ, उपाध्यक्ष अरुण बागडे, प्रशासन अधिकारी दीपाली दिवेकर, सिध्देश लखमदे, नैनिता कर्णिक, उषा खोत, विनय मथुरे, प्रविण बैकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version