| चिरनेर | प्रतिनिधी |
कामगार कल्याण राज्य नाट्य स्पर्धेत देवळाली केंद्र नाशिकतर्फे बायको पाहावी सांभाळून, या सामाजिक नाट्यकलाकृतीचे नुकतेच सादरीकरण करण्यात आले. सचिन उतेकर यांनी या नाटकाचे लेखन केले आहे. तर सुनील गायकवाड यांचे या नाटकाला दिग्दर्शन लाभले आहे. नाटकात रवी आणि प्रिया हि दोन प्रमुख पात्रे असून, नवरा बायकोच्या नातेसंबंधावर आधारलेले हे नाटक आहे. नाटकात मिलिंद चिखलीकर, सागर येलमाने, विलास हांडगे, तुषार गायकवाड या कलावंतांनी देखील अभिनयातून बारकावे साधत, आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. जयप्रकाश पुरोहित, ईश्वर जगताप, माणिक कानडे, अनुराधा गायकवाड, यांनी रंगभूषा, वेशभूषा, नेपथ्य आणि प्रकाश संयोजनातून नाटकातील प्रत्येक प्रसंग फुलविला आहे.