। पनवेल । प्रतिनिधी ।
कामोठे सेक्टर 6 मधील साईनाथ अपार्टमेंटमधून एक 57 वषीय व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. रविकुमार सुदर्शन बल्ला असे बेपत्ता व्यक्तीचे नाव असून त्यांची उंची पाच फूट तीन इंच, नाक सरळ, केस पांढरे व मध्यम, दाढी पांढरी वाढलेली, डोळे काळे, रंग गोरा, बांधा सडपातळ, गालावर खड्डे, गळ्यात चांदीची चेन व रुद्राक्षाची माळ आणि उजव्या हातात दोन अंगठ्या आहेत. त्यांनी अंगात निळा पांढरा हाफ टि-शर्ट व निळी पॅन्ट घातली आहे. त्यांना हिंदी, मराठी, तेलगु व इंग्रजी भाषा येते. अशा वर्णनाची व्यक्ती कोणाला दिसल्यास त्यांनी कामोठे पोलीस ठाणे 8655354114 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





