| पनवेल | प्रतिनिधी |
खारघर वसाहती येथील सेक्टर 12 ब्रिस्टो हॉटेल येथून एक व्यक्ती हरवल्याची तक्रार खारघर पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे. या व्यक्तीचे नाव सुरेशसिंग चैतसिंग राणा (41) असे असून ते अंगाने मध्यम, रंगाने काळे, उंची 5.2 फुट, केस काळे, नाक सरळ, अंगात हॉटेलचा ड्रेस ब्राउन शर्ट, ब्राऊन रंगाची पॅन्ट, पायात पांढऱ्या रंगाचे शुज घातलेले असून त्यांना हिंदी गडवाली भाषा अवगत आहे. या व्यक्तीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास खारघर पोलीस ठाणे किंवा पोलीस हवालदार नितीन आखाडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.







