पेठेचा राजा गणेश मंडळाची कागदाच्या लगद्यापासून मूर्ती

| महाड | प्रतिनिधी |

महाडमधील पेठेचा राजा बालमित्र मंडळ सार्वजनिक गणपती मंडळ मंडपाचा भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अमृत महोत्सवाचे औचित्य साधत शनिवारी सकाळी 11 वाजता करण्यात आला.

या वर्षी कुडाळ येथील एका कार्यशाळेतून कागद्याच्या लगद्यापासून बनविण्यात आलेली साडेपाच फूट पर्यावरण पूरक गणपतीची मूर्तीची स्थापना करण्यात येणार आह.यावेळी महाड नगरपालिका शाळा नंबर 1 च्या प्रांगणामध्ये बूस्टर डोस चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सुमारे 80 पेक्षा जास्त नागरिकांनी डोसचा लाभ घेतला. ग्रामीण रुग्णालय मधील वैद्यकिय कर्मचारी भावना सावंत ,शिल्पा मुसळे ,योगेश नातेकर आदीनी नागरिकांना कोव्हीशिल्ड कोव्हक्सीं सह बूस्टर डोस देण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष साहिल हेलकर,अक्षया हेलकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.या वेळी धनंजय बागडे ,सुहास तलाठी, जितेश तलाठी, राजा डोळस, अजित बागडे. सुधीर शेठ, अशोक कोकणे,रमेश मुळे, रुचिता मुळे , वनारसे , टमके यासह मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version