| मुंबई | प्रतिनिधी।
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या झळा आता भारतात बसू लागल्या आहेत. कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत असल्याने भारतातील इंधन तेलाच्या दरात वाढ केली जात आहे. गेल्या 10 दिवसांत भारतात चौथ्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी चार वर्षानंतर दि.15 मे रोजी इंधन तेलाच्या दरात वाढ केली. त्यानंतर 10 दिवसांत आतापर्यंत चार वेळा कमी अधिक प्रमाणात दर वाढवण्यात आले आहेत. पेट्रोल डिझेलच्या दरात सोमवारी (दि.25) पुन्हा एकदा वाढ करण्यात आल्याने पेट्रोलचे दर 2 रुपये 61 पैशांनी तर डिझेलचे दर 2 रुपये 71 पैशांनी वधारले आहेत. त्यामुळे गेल्या 10 दिवसांत पेट्रोल आणि डिझेल प्रती लीटर 7 रुपयांनी महाग झाले आहे. त्यामुळे डिझेल 97.83 रुपये, तर पेट्रोल 111.18 रूपये प्रती लीटर झाले आहे.
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ
