| पनवेल ग्रामीण | वार्ताहर |
कामोठे वसाहतीच्या मोकळ्या भूखंडांनवर डेब्रिज टाकला जाऊ नये, या करिता सिडकोच्या माध्यमातून इशारा देणारे फलक लावण्यात आले आहेत. मात्र, या फालकांकडे दुर्लक्ष करत फलकाखालीच डेब्रिजचे ढिगारे टाकण्यात येत आहेत. महत्वाचे म्हणजे फलकावर देण्यात आलेल्या कायदेशीर कारवाईच्या ईशाऱ्याकडे दुर्लक्ष करून डेब्रिजचे ढिगारे टाकणाऱ्यांवर कोणतीच कारवाई केली जात नसल्याने सिडकोच्या या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.
पनवेल पालिका हद्दीत डेब्रिजचा प्रश्न गंभीर आहे. परिसरात सुरु असलेल्या विकास कमांमुळे मोठ्या प्रमाणात डेब्रिज (राडारोडा) निर्मित होत असून डेब्रिजची विल्हेवाट लकवण्यात मोठी अडचण येत आहे. अशावेळेला विक्षकांकडून जागा मिळेल त्या ठिकाणी डेब्रिजचे ढीग फेकले जात असल्याने वसाहतीना डेब्रिजचा विळखा पडला आहे. तसेच, कामोठे वसाहती लगत असलेल्या खाडी किनाऱ्यावरील कांदळ वनाचे देखील नुकसान होत आहे. त्यामुळे बेकायदेशीर पणे डेब्रिजची विल्हेवाट लावणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी एकता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अमोल शितोळे यांनी केली आहे.