प्रकल्पस्तरीय क्रिडा स्पर्धेत पिंगळस आश्रम शाळा विजयी

रत्नागीरी-रायगड जिल्ह्यातील 25 शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग

| कर्जत | प्रतिनिधी |

कर्जत तालुका हा बहुल आदिवासी भाग असून, अनेक आदिवासी भागातील विद्यार्थी हे शासकीय आश्रम शाळेत शिक्षण घेत आहेत. याच आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थीनी साठी पेण प्रकल्प आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यामिक आश्रम शाळा ही पिंगळस येथे कार्यरत आहे.

या आश्रम शाळेमध्ये चौथ्या वर्षीचे प्रकल्प स्तरीय क्रिडा स्पर्धांचे 2025-26 असे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये रत्नागिरी, रायगड जिह्यातील 24 शाळामधील काही शासकीय तर काही आनुदानीत आश्रम शाळेतील एकूण 1235 विद्यार्थी, विद्यार्थांनी खेळात सहभाग घेतला होता. या स्पर्धांमधील कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल, रनिंग, हॅन्डबॉल, गोळाफेक, रिले, लांब उडी यासारख्या स्पर्धा जिंकून रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील शाळामधून अव्वल गुण मिळवून प्रकल्प स्तरीय क्रिडा स्पर्धत तिसऱ्यांदा कर्जत तालुक्यातील पिंगळस शासकीय आश्रम शाळा ही विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या उत्कृष्ट खेळातील कामगिरीच्या जोरावर चॉम्पियन ट्राफिची मानकरी ठरली आहे.

प्रकल्प स्तरीय क्रिडा स्पर्धाचे उद्घाटन अपर आयुक्त आदिवासी विभाग ठाणे गोपीचंद सुंदराबाई मुरलीधर कदम, प्रकल्प अधिकारी ए.आ.वि. प्रकल्प पेण तेजस्विनी मंगल रघुनाथ गलांडे, प्रमुख उपस्थिती उपजिल्हाधिकारी आंतरराष्ट्रीय धावपटू उपायुक्त नवी मुंबई म.न.पा. ललिता नर्मला शिवाजी बाबर -भोसले, यांच्यासह आयोजक मुख्याध्यापक तथा क्रिडासंचालक प्रकल्प स्तरीय क्रिडास्पर्धा पेण रमेश द्रौपदी साहेबराव चव्हाण यांच्या हस्ते दिपप्रज्वोलीत करून छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, आदिवासी क्रांतीकारक बिरसा मुंडा, सरस्वती प्रतिमेला हार अर्पण करून क्रीडा स्पर्धाना सुरुवात करण्यात आली.
शासकिय माध्यमिक उच्च माध्यामिक आश्रम शाळा पिंगळस येथे चौथा वर्षीचे स्पर्धचे नियोजन पेण प्रकल्प स्तरीय रायगड, रत्नागीरी जिल्हयातील एकूण 24 शाळेतील एकूण 1235 विद्यार्थी,विद्यार्थिनी सहभाग घेऊन आपले क्रीडा कौशल्य आपआपल्या खेळामधून प्रदर्शित केले आहे.

या स्पर्धत कबड्डी, खो- खो, हॅलीबॉल, रनिंग, हॅन्डबॉल, लांबउडी, या स्पर्धा तीन दिवासाच्या खेळवल्या गेल्या. या स्पर्धाना दि. 29 नोव्हेबर पासून सुरु करण्यात आली असुन, त्या आलेल्या क्रीडा स्पर्धांचे दि.1 डिंसेबर रोजी बक्षिस वितरण करून तीन दिवशीय प्रकल्प स्तरीय क्रिडा स्पर्धा खेळवल्या गेल्या आहे. शेवटच्या दिवशी बक्षिस वितरण, परितोषिक घेऊन सर्व शाळा त्याच दिवशी आपल्या शाळेवर परतीच्या प्रवासानी निघून गेल्या. यावेळी पेण प्रकल्प सहय्याक अधिकारी, तालुक्यातील आदिवासी समाज संघटना कर्जत, आदिवासी महादेव कोळी समाज संघटना पदाधिकारी, सर्व शाळेचे मुख्याध्यापक, अध्यक्षक, शिक्षकवृद, वर्ग चार चे कर्मचारी हे उपस्थित होते.

Exit mobile version