| मुंबई | प्रतिनिधी |
गुजरातच्या अहमदाबादमध्ये सर्वात मोठी दुर्घटना घडली आहे. अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात एअर इंडियाचं AI – 171 हे प्रवासी विमान कोसळलं आहे. यात अनेक भारतीय, ब्रिटिश आणि इतर देशांचे नागरिक होते. अपघातग्रस्त विमानातून सात मराठी लोकंही प्रवास करत होते. विमान दुर्घटनेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनिल तटकरे यांची भाचेसून प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाला असून, या अपघातग्रस्त विमानात 242 प्रवासी होते.
एअर इंडियाचे AI171 विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. हे विमान डॉक्टरांच्या वसतिगृहाजवळ कोसळले असून, यात अनेक भारतीय, ब्रिटिश आणि इतर देशांचे नागरिक होते. अपघातग्रस्त विमानातून काही मराठी लोकंही प्रवास करत होते. यामध्ये तीन प्रवासी आणि चार क्रू मेंबर्सचा समावेश आहे. टेकऑफनंतर विमान कोसळल्यानं ही मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
विमान प्रवासात महाराष्ट्रातून सुनील तटकरेंच्या सुनबाई देखील होत्या. तटकरेंच्या मोठ्या बहिणीच्या सूनबाई आहेत.त्यांची एक बहीण कोल्हापुरात राहते पण त्या सुद्धा दिल्लीत आहेत. अपर्णा महाडिक केबीन क्रू आहे. आज सकाळीच अहमदाबादला गेल्या होत्या आज दुपारीची फ्लाईट होती. अपर्णा यांचे पती सुद्धा एअर इंडीयामध्ये आहेत. अपर्णा महाडीक ही सुनिल तटकरे यांच्या सुनबाई आहेत. त्या या फ्लाईटनध्ये होत्या. त्या सुनिल तटकरे यांच्या सख्ख्या भाच्याची बायको आहेत. ते मुंबईतील गोरेगाव येथे राहत होते.