खराब हवामानामुळेच विमान दुर्घटना

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत देशाचे चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपीन रावत यांचं निधन झाले. या हेलिकॉप्टर अपघात प्रकरणाची हवाई दलाच्या मार्फत चौकशी करण्यात आली आहे. हेलिकॉप्टरच्या बॉक्समधील संवाद आणि वस्तुस्थितीनुसार पुरावे तपासण्यात आले. हेलिकॉप्टरमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड झाला नव्हता, खराब हवामानामुळेच हा अपघात झाल्याचा निष्कर्ष कोर्ट ऑफ एन्क्वायरीने काढला आहे. बिपीन रावत यांचे 8 डिसेंबर 21 रोजी हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालं. त्यांच्यासह त्यांची पत्नी मधुलिका आणि 11 अधिकारी आणि जवान यांचं निधन झालं. धुक्यामुळे ही दुर्घटना झाल्याचं म्हटलं जात होतं. याप्रकरणी वायुदलाने दुर्घटनेच्या तपासासाठी कोर्ट ऑफ एन्क्वायरीचे आदेश दिले होते.

Exit mobile version