। कॅनडा । वृत्तसंस्था ।
कॅनडातील वँकूवरजवळील चिल्लीवॅक येथे हे विमान दुघर्टनाग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. या विमानामध्ये दोन भारतीय शिकाऊ पायलट होते, त्यांचा या अपघातात मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
या अपघातात भारतीयांसह तिघांचा मृत्यू झाला आहे. या विमानात दोन भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान परिसरातील एका झाडावर आदळल्यानंतर अपघात झाला. कॅनडातील वँकूवरजवळील चिल्लीवॅक येथे हे विमान दुघर्टनाग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे.
पायपर पीए-34 सेनेका हे दुहेरी इंजिन असलेले हलके विमान चिलीवॅक शहरातील मोटेलच्या मागील झाडांवर आदळून हा अपघात झाला. त्यानंतर हे दुर्घटनाग्रस्त विमान हॉटेल इमारतीच्या मागे कोसळलं, अशी माहिती कॅनडाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या दुर्घटनेत दोन भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा दुर्दैवी अंत झाला असून त्यांची नावे अभय गडरू आणि यश विजय रामुगाडे अशी आहेत. हे दोन्ही भारतीय मुंबई येथील रहिवासी होते. स्थानिक प्रशासन घटनास्थली पोहोचलं असून यासंदर्भात अधिक तपास सुरु आहे.