श्रीया फाऊंडेशनच्या माध्यमातून पाले येथे वृक्षारोपण

। उरण । वार्ताहर ।
रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील (भा.प्र. से.) यांच्या आवाहनानुसार व मार्गदर्शनानुसार उरण तालुक्यातील पाले गावातील श्रीया फाऊंडेशन या सामाजिक संस्थे तर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. यावर्षी प्रथमच विविध प्रकारची 100 झाडे लावण्याचा व जोपासण्याचा संकल्प श्रीया फाऊंडेशनने केला आहे. पाले हनुमान मंदिर परिसर व पाले डोंगरात झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी श्रीया फाऊंडेशन पाले अध्यक्षा स्मिता म्हात्रे, समीर पाटील सिनियर मॅनेजर महाराष्ट्र कॉमन सर्विस सेंटर, संतोष ठाकूर सामाजिक कार्यकर्ते युसूफ मेहेर अली सेंटर तारा पनवेल, राजेश पाटील रायगड जिल्हा मॅनेजर कॉमन सर्विस सेंटर, जितेंद्र थळे सामाजिक कार्यकर्ते पनवेल, चंद्रकांत म्हात्रे निवृत्त पोलीस निरीक्षक, पोसुराम म्हात्रे निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्रीकांत म्हात्रे निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक,ऋषिकेश म्हात्रे सुप्रिटेंड जेएनपीटी,अमित म्हात्रे पाले गाव अध्यक्ष, आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मिलिंद म्हात्रे यांनी केले. सदर कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र थळे यांनी 100 झाडे भेट दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीया फाऊंडेशनच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version