। नेरळ । प्रतिनिधी ।
शासनाने झाडे लावण्यासाठी जून 2021 ते जुलै 2021 या कालावधीत वन महोत्सव साजरा करण्याचे जाहीर केले आहे. नेरळ वन विभाग आणि शेलू गावातील तरुण मंडळ यांनी शेलू येथे वृक्षारोपण करून वन महोत्सवाची सुरुवात केली.
शासनाने वन महोत्सव साजरा करण्याची घोषणा केल्यानंतर नेरळ वन विभाग आणि शेलू येथील तरुण मंडळ यांच्या माध्यमातून शेलू येथील वन जमिनीवर वृक्षारोपण करण्यात आले. कल्याण-कर्जत राज्यमार्ग रस्त्यावरील शेलू गावाची स्वागत कमान ते रेल्वे फाटक या दरम्यान शेलू गावातील तरुणांनी एकत्र येऊन वृक्ष लागवड त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प केला आहे. या वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात वन विभागाचे वनक्षेत्रपाल नारायण राठोड यांचे हस्ते सुरुवात करण्यात आली. त्यावेळी शेलू गावचे पोलीस पाटील मनोज मसणे यांच्यासह तरुणवर्ग आणि वन विभागाचे वनपाल, वनमजूर आणि वनरक्षक आदी उपस्थित होते.