तोंडरे येथे वृक्षारोपण

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कृषी दिनानिमित्त रायगड जिल्हा परिषद तोंडरेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जालिंदर वाघ यांनी वृक्षारोपण का करावे? त्याचे महत्त्व काय याविषयी माहिती दिली. प्रभात नाईक यांनी आपल्या पूर्वजांनी झाडांचे महत्त्व जाणले होते. यासाठीच त्यांनी निसर्गाच्या सान्निध्यात पोहोचण्यासाठी तसेच निसर्गाची संबंध जोडण्यासाठी कसे सण, व्रत-वैकल्य निर्माण केले आहेत, याची माहिती दिली.
आपल्या घराच्या बाजूला नेहमी तुळस, कडुलिंब, आदुलसा, कोरफड आदी औषधी वनस्पती का असाव्यात, याची महती कथन केली. तसेच मुलांनी वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट न वाटता शाळेला एक झाड भेट द्यावे. त्याची निगा त्याच विद्यार्थ्यांनी वर्षभर करावी आणि निसर्गाची आपले संबंध अजून दृढ करावे, असे अवाहन केले. यावेळी शाळेच्या प्रांगणात आणि आजूबाजूच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी एक विद्यार्थी एक झाड असे आवाहन करून शिक्षक बालाजी जकाकुरे व अन्य सहकारी शिक्षकांनी 500 झाडे लावण्याचे संकल्प आखला. वृक्षारोपण राजेश मोकल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी आठवीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात वृक्षारोपण केले.

Exit mobile version