| मुरुड | वार्ताहर |
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पर्यावरण विभाग व मोरया ग्रुप, नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यांतील उसरोली, नांदगाव समुद्रकिनारा, नागेश्वरनगर व वाघोबा मंदीर परिसरात चिंच, बोर, बांबू, बहावा, करंज,आवळा अशी विविध प्रकारची 120 रोपे लावण्यात आली. रा.स्व.संघ पर्यावरण विभाग जिल्हा सहप्रमुख महेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 49 स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे या वृक्षारोपण मोहिमेत सहभागी घेतला. संघाच्या माध्यमातून पेड,पाणी आणि प्लॅस्टिक या विषयांवर भरीव काम तालुक्यात उभे करणार असल्याचे महेंद्र पाटील यांनी सांगितले. 17 सप्टेंबरला जागतिक स्वच्छतादिनी समुद्रकिनारे स्वच्छ करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मोहिमेत सागरी सीमा सुरक्षा मंचचे कोकण प्रांत संघटन मंत्री अनिकेत कोंडाजी,अशासकीय संस्थेचे निलेश गुंड,समीर चोरघे, कोळी समाज सचिव आतिष आग्रावकर,समीर उपाध्ये, संजय ठाकर, कुणाल गाणार,विनोद जोशी आदी सहभागी झाले होते.