। गडब । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील गडब गावातील वडाखाली हे प्रसिद्ध ठिकाण या ठिकाणी दोन पुरातन वडांची झाडे होती. या ठिकाणी गडब गावातील बाजार भरत असे. कालांतराने ही झाडे उन्मळून पडली. आज तिथे वडाची झाडे नाहीत; परंतु वडाखाली हे नाव अजून प्रचलित व प्रसिद्ध आहे. 25 ते 30 वर्षांनंतर या ठिकाणी ग्रामपंचायतीमार्फत वडाचे झाड लावून जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न काराव गडब ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आला. या ठिकाणी वटवृक्षाचे रोप लावण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच मानसी पाटील, उपसरपंच मनोज म्हात्रे, सदस्य दिनेश म्हात्रे, जगदीश कोठेकर, मनोहर पाटील, दीपक कोठेकर, सदस्या भाग्यश्री कडू, कीर्ती म्हात्रे, सीता पाटील, वैशाली म्हात्रे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.