विविध जातींच्या वृक्षांची लागवड

। रसायनी। वार्ताहर।

दिव्य ज्योति जागरूकता संस्थान, शाखा चाकणद्वारा संचालित जागतिक पर्यावरण दिननिमित्त मोहोपाडा रसायनी क्षेत्रामध्ये संस्थानच्या “संरक्षण’’ प्रकल्पाअंतर्गत सामुदायिक वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (दि.30) जून रोजी करण्यात आले होते. यावेळी मोहोपाडायेथील जनता विद्यालय, रिस मैदान, टाकेदेवी दांडफाटा, एमआयडीसी डोंगर आदी परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.

या उपक्रमाचा उद्देश मोहोपाड़ा सोबतच संपुर्ण भारतामध्ये पर्यावरणीय स्थिरता आणि समुदाय प्रतिबद्धता वाढवणे ही असून या उपक्रमामध्ये स्थानिक शाळा, व्यवसाय आणि रहिवाशांच्या अंदाजे 100 स्वयंसेवकांचा समावेश असलेला एक सहयोगी प्रयत्न आहे. संगठित व सामूहिक प्रयत्नाने नियुक्त केलेल्या ठिकाणी अंदाजे 200 ते 300 झाडे लावण्यात आली. यावेळी विविध पोस्टर्सच्या माध्यमाने जनमानसात पर्यवरणा विषयी संदेश देण्याचा प्रयत्न कासंस्थानच्या स्वयंसेवकांनी केला. सतत होत असलेल्या पर्यावरणीय संकटाला लक्षात घेऊन दिव्य ज्योति जागरूकता संस्थान द्वारा संरक्षण प्रकल्पाच्या अंतर्गत पर्यावरण संतुलनाला पुन्हा स्थापित करण्यासाठी जल संरक्षण, झाडाची कटाई थांबवण्यासाठी वनसंरक्षण, ऊर्जा संकटांना पूर्ण करण्यासाठी ऊर्जा संरक्षण असे उपक्रम ठिकठिकाणी राबवण्यात येत आहेत.

Exit mobile version