इस्त्रायली आंब्याची चिरनेरमध्ये लागवड

| चिरनेर | वार्ताहर |

चिरनेर येथील अविनाश म्हात्रे या होतकरू शेतकर्‍यांनी आपल्या मालकीच्या पडीक माळरानावर जमिनीचे सपाटीकरण करून त्या मातीत आधुनिक इस्रायल पद्धतीने आंब्याची लागवड केली आहे. अत्यंत घनपद्धतीने केलेली ही आंबाबाग आता चांगलीच बहरली असून, उरण तालुक्यात एका शेतकर्‍याने केलेला हा पहिला आधुनिक प्रयोग पाहण्यासाठी अनेक शेतकरी या बागेला भेट देत आहेत.

म्हात्रे यांनी त्यांच्या मालकीच्या सुमारे दोन एकर पडीक खडकाळ माळरानाचे व्यवस्थीत सपाटीकरण करुन त्याचे प्लॉटिंग केले.त्या प्लॉटवर चार बाय आठ या अंतराने सरळ रेषेत खड्डे मारून त्यात माती व शेणखत टाकून त्यामध्ये केशर जातीच्या आंब्याची लागवड केली आहे. त्यासाठी दोन झाडातील अंतर चार फूट तर आठ फुटाचे अंतर दोन गाळ्यात ठेवले आहे. पुढच्या दोन वर्षात या बागेतुन व्यावसायिक उत्पादन सुरू होऊन पारंपारिक आंबा बागेपेक्षा चौपट उत्पन्न मिळेल असा विश्‍वास अविनाश मात्रे यांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version