‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून वृक्षारोपण

। माणगाव । प्रतिनिधी ।

हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट कॉलेज ऑफ सायन्स (सीएसआयटी) महाडच्या एन.एस.एस. विभाग व केंद्र सरकारच्या ‘एक पेड माँ के नाम’ योजनेंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम शनिवारी (दि.27) यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला. या उपक्रमाचा एक भाग म्हणून महाविद्यालयाच्या परिसरात एकूण 70 झाडे लावण्यात आली.
यावेळह सुदेश कदम यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून दिले व अशा उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. तसेच, किशोर धारिया यांनी या उपक्रमाबाबत आपले विचार मांडताना पर्यावरण विषयक जागरुकता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देणे काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले. सोनाली धारिया यांनी पर्यावरण संवर्धनासाठी भविष्यात वृक्षारोपणाबरोबरच इतर पर्यावरण पूरक उपक्रम महाविद्यालयात राबवणे अतिशय महत्वाचे आहे असे मत व्यक्त करून सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना अश्या उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्याकरिता आवाहन केले.

Exit mobile version