| कर्जत | वार्ताहर |
जीवनविद्या मिशन डोंबिवली शाखेने ग्रामसमृद्धी अभियानांतर्गत दत्तक घेतलेल्या तालुक्यातील भिवपूरी या गावात वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. भारत माता ही सुजलाम सुफलाम व्हावी या उद्देशाने जीवनविद्या मिशन डोंबिवली शाखेने 100 रोपांचे वृक्षारोपण केले आहे. ह्या उपक्रमाला गावातील सर्व ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सरपंच संगीता माळी, ग्रामसेविका अनुजा ऐनकर, कृषी अधिकारी लोहकरे यांच्या पुढाकाराने संपन्न झाला. या उपक्रमाला जीवनविद्या मिशन डोंबिवली शाखेचे अध्यक्ष भावेश कचरे, सचिव सुमित शिगवण, तसेच युवा स्वयंसेवक मनोहर फाकटकर, सुश्मिता बार्शी, प्रशिक साखरे, शैलेंद्र मुंज, निखिल बोडके, ओम पेडणेकर, आरती पांढरपट्टे, आदित्य पन्हाळे, स्वानंद बिनसाळे, उमेश खोचरे, सागर कचरे आदी उपस्थित होते.
जीवनविद्या मिशनतर्फे दत्तक गावात वृक्षारोपण
