आदिवासी समाज संघटनेच्यावतीने वृक्षरोपण

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुका आदिवासी संघटनेच्यावतीने वन विभागाच्या मदतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता. कर्जत तालुका आदिवासी समाज संघटना ही नेहमीच सामाजिक, शैक्षणिक कार्यात अग्रेसर असून विविध उपक्रम राबवत असते. शासनाच्यावतीने 1 जुलै ते 7 जुलै दरम्यान वन महोत्सव राबविला जातो, या निम्मिताने आदिवासी समाज संघटनेच्यावतीने दरवर्षी वृक्षरोपण केल जाते. या वर्षी आदिवासी समाज संघटनेच्यावतीने मार्गाची वाडी (पाथरज) या ठिकाणी संघटनेचे उपाध्यक्ष मंगळ केवारी यांनी संघटनेला दोन एकर जमीन दान केलेल्या जागेत वन विभाग पाथरज यांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी 100 रोपांची ‘झाडे लावा झाडे जगवा’चा नारा देत लागवड करण्यात आली.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष परशुराम दरवडा, उपाध्यक्ष मंगळ केवारी, सचिव भगवान भगत, कर्जत पंचायत समितिच्या माजी उपसभापती जयवंती हिंदोळा, सह सचिव आणि खजिनदार अर्जुन केवारी, दत्तात्रेय हिंदोळा सर, काशिनाथ पादीर, दशरथ पारधी, काळूराम वारघडा लक्ष्मण उघडे, अरुण केवारी, अर्जुन खंडवी वनविभाग कर्मचारी केंद्रे कर्मचारी आणि संघटनेचे कार्यकर्ते यांनी वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतला.

Exit mobile version