फणसवाडीत सीडबॉलच्या माध्यमातून वृक्षारोपण

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

नेरळ विद्या मंदिर शाळेचा पर्यावरणपूरक अभिनव उपक्रम

| कर्जत | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील नेरळ विद्या मंदिर विद्यालयाच्यावतीने नेरळमधील फणसवाडी येथे सीडबॉल व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. या अभिनव उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्यावतीने उन्हाळ्याच्या सुट्टीत गोळा केलेल्या विविध प्रकारच्या फळांच्या बीजांचे रोपण व नवीन रोपांची लागवड फणसवाडी येथील डोंगर परिसरात करण्यात आली.

विद्या मंदिर मंडळाचे कार्यकारिणी सदस्य व वृत्तपत्रलेखक दिलीप गडकरी यांनी नेरळ विद्या मंदिर येथील एका कार्यक्रमाप्रसंगी पर्यावरण संवर्धनविषयक मार्गदर्शन करताना सीडबॉलची अभिनव कल्पना शिक्षकांसमोर मांडली होती. विविध प्रकारच्या फळांच्या बिया गोळा करून त्या मातीत टाकून ओलसर मातीचे गोळे तयार करायचे व ते सुकवून डोंगर, माळरान अशा ठिकाणी नेऊन रोपण करावयाचे, याच बिया त्या ठिकाणी मातीत रुजून त्याची रोपे तयार होतात व वाढतात, अशी ही सुंदर कल्पना होती. विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद विचवे यांना ही कल्पना आवडली. त्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना आवाहन केले व या सीडबॉल उपक्रमाचे नियोजन केले. त्यानुसार विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीत बिया गोळा करून सीडबॉल तयार करण्यासंबंधी मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या.

नियोजनानुसार नेरळ शहरापासून तीन कि.मी. अंतरावर असलेल्या फणसवाडी येथील डोंगरात जाऊन विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सीडबॉल रोपण केले. तसेच आंबा, जांभुळ, नारळ, चिंच, पेरू अशी विविध रोपे लावली. 130 विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. यावेळी क्रीडा शिक्षक जे.के. पारधी, पी.पी. विशे, एस.एल. सुतार, वाय.व्ही. गेंगजे, कृष्णा हाबळे, एन.एल. वडणे, ए.एम. वसावे इत्यादी शिक्षक उपस्थित होते. प्रा. प्रमोद विचवे, उपप्राचार्य एम.के. परदेशी आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Exit mobile version