मानीभूते येथे प्लास्टीकबंदी जनजागृती

| अलिबाग | प्रतिनिधी |
मानीभुते-अलिबाग येथे कौशल्य विकास व स्वच्छता उपक्रम आदिंना प्रोत्साहन देण्याच्या उददेशाने जे.एस.एम कॉलेज अलिबाग व जेएसएस रायगडच्या माध्यमातून प्लास्टिकबंदी जन जागृती उपक्रमम राबवण्यात आला. या उपक्रमाप्रसंगी गावकर्‍यांना व एन.एस.एस स्वयंसेवक यांना ह्या प्रसंगी कागदी व कापडी पिशव्या बनवण्याचे मार्गदर्शन मुख्य मार्गदर्शक डॉ. विजय कोकणे यांच्या माध्यमातून करण्यात आले सहाय्यक प्रशिक्षिका प्रतिक्षा सचिन चव्हाण यांनी उपस्थितांकडून सराव करून घेतला .आभार प्रदर्शन प्रतीक्षा चव्हाण यांनी केले.

संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा किरीट सोमैया, अध्यक्ष डॉ. नितीन गांधी , उपाध्यक्ष सौ गीतांजली ओक, संचालक डॉ. विजय कोकणे,जे.एस.एम कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील व व्यवस्थापक मंडळ यांच्या मार्गदर्शनातून भारत सरकारच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत कार्यक्रम राबविले जात आहेत. या प्रसंगी डॉ. विजय कोकणे. प्रा. डॉ प्रवीण गायकवाड व प्रा. श्‍वेता पाटील, प्रतिक्षा चव्हाण, हिमांशू भालकर हे कर्मचारी व स्वयंसेवक उपस्थित होते.

Exit mobile version