जिल्ह्यात प्लास्टिक बंदी; सोमवारपूस कडक अंमलबजावणी

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
राज्य सरकारच्या आदेशानुसार रायगड जिल्ह्यात देखील 1 जुलैपासून प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. सोमवारपासून याची कठोर अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी दिलीे. मोठ्या प्रमाणावर निर्माण होत असलेल्या मसिंगल यूज प्लास्टिकफची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधित उत्पादकांवर निश्‍चित करण्यात आली आहे. त्यामुळे उत्पादकांनाच निर्मिती केलेल्या उत्पादनाची विल्हेवाट किंवा पुनर्वापर करून घ्यावा लागेल. याला सक्षम पर्याय निर्माण होत नाही, तोवर उत्पादकांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी असणार आहे.
राज्यासह देशभरात 1 जुलैपासून मसिंगल यूज प्लास्टिकफवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स नेमण्यात आला. त्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. यानंतरही उल्लंघन करणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
मसिंगल यूज प्लास्टिकफ बंदी घालण्यात आल्यानंतर उद्योजकांनी लगेच कारवाई करू नका, असे आवाहन केलं आहे. या पार्श्‍वभूमीवर व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी मसिंगल यूज प्लास्टिकफ आम्ही पाठिंबा देत आहोत, पण लगेच कारवाई करू नये, मुदत देण्यात यावी. अशी भूमिका मांडली. बंदीबाबत जनजागृती करण्यासाठी प्रबोधन करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. कोणते प्लास्टिक चालते, कोणते चालत नाही याचीही माहिती द्यावी, असे व्यापार्‍यांनी सांगितले

रायगड जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी सोमवारपासून सुरु करण्यात येणार असून नियम भंग करणार्‍यांवर दंड आकारण्यात येणर आहे.

श्याम पोशेट्टी, जिल्हा प्रशासन अधिकारी


पहिला गुन्हा पाच हजार रुपये दंड
दुसरा गुन्हा 10 हजार रुपये दंड
तिसरा गुन्हा 25 हजार रुपये दंड आणि 3 महिन्याचा कारावास

कशावर बंदी
प्लास्टिकच्या कांडयासह कानकारेणी, फुग्यांसाठी प्लास्टिकच्या कांडया, प्लास्टिकचे झेंडे, कँडी कांड्या, आईस्क्रिम कांड्या
सजावटीसाठी प्लास्टिक व पॉलिस्टीरीन (थर्माकोल)
प्लेटस, कप, ग्लासेस, कटलरी, स्ट्रॉ, ट्रे, ढवळण्या, मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड, सिगारेटची पाकिटाभोवती प्लास्टिक फिल्म गुंडाळणे, प्लास्टिकच्या पीव्हीसी बॅनर (100 मायक्रॉनपेक्षा कमी)
सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या
सर्व प्रकारच्या नॉन-ओव्हन बॅग्स
एकल वापर प्लास्टिकचे उत्पादन-डिश, बाउल, कंटेनर

Exit mobile version