रायगडात प्लास्टिकमुक्त किनारा; बंदर विभागाचा निर्धार

श्रीवर्धन तालुक्यात समुद्रकिनार्‍यांची स्वच्छता
| दिघी | वार्ताहर |
पावसाळी हंगाम मध्यवर्ती येऊन ठेपला आहे. अधूनमधून बरसणार्‍या श्रावणसरींचा आनंद लुटण्यास, आता पर्यटकांची पाऊले पुन्हा कोकणाकडे वळली आहेत. त्यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील विकासाची दूरदृष्टी ठेवून येथील महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड व ग्रामस्थांकडून स्वछ व सुंदर समुद्रकिनारे मोहीम राबवली जात आहे.

तालुक्यातील, आरावी बीच तसेच दिघी येथील प्रवासी टर्मिनल अशा प्रमुख ठिकाणी पर्यटकांची तशीच स्थानिक प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. सध्या पावसाळी वाहून आलेल्या कचर्‍यामुळे अस्वच्छतेचा आपल्या पर्यावरणावर कोणताही विपरीत परीणाम होऊ नये याचा विचार करण्यात आला. स्वच्छतेसाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मार्फत घेण्यात आलेल्या मस्वछ सागर, सुरक्षित सागरफ या उपक्रमांतर्गत स्थानिक नागरिकांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला. या चार दिवस सुरू असलेल्या स्वच्छता अभियानातून पर्यटन वाढीस आलेल्या श्रीवर्धनच्या सौंदर्यात भर पडत आहे.

समुद्रकिना-यावर होणारा प्लास्टिक व इतर कचरा त्यामुळे होणारी अस्वच्छता हे पर्यावरणासाठी धोकादायक बाब ठरत असल्याने महाराष्ट्र सागरी मंडळ, संस्था, ग्रामस्थ यांच्या सयुक्तिने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. सदर मोहिमेत महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे बंदर निरीक्षक प्रकाश गुंजाळ, राहुल धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिघी जलवाहतूक संस्थेचे कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेतला. प्लास्टिक हे पर्यावरणावर विघातक परिणाम करत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा र्‍हास थांबवण्यासाठी प्रत्येक किनार्‍यावरील 30 पेक्षा अधिक बॅग कचरा जमा करण्यात आला. या उपक्रमात मोठ्या प्रमाणात कचर्‍याची विल्हेवाट लावून श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारे प्लास्टिक मुक्त करण्यात आले.

Exit mobile version