दुकानदारांचा प्रतिसाद
सोशल मिडिया निसर्ग ग्रुपचा उपक्रम
| रेवदंडा | प्रतिनिधी |
चौल भोवाळे यात्रेत प्रतिवर्षी निर्माण होणारा प्लास्टिक कचरा संकलनास जत्रेतील व्यापार्यांनी प्रतिसाद दिला. सोशल मिडिया निसर्ग ग्रुपने चौल ग्रामपंचायतीच्या सहकार्याने कचरा संकलनाच्या स्तुत्य उपक्रम राबविला होता. यात्रेतील लहानमोठया दुकानदारानी प्रतिसाद दिल्याने तो यशस्वीपणे पार पडला.
शैलेश राईलकर यांनी सोशल मिडिया निसर्ग ग्रुपद्वारे यात्रेतील कचरा संकलनाची संकल्पना मांडळी होती. या संकल्पनेस निसर्ग ग्रुपच्या सभासदानी उचलून धरले, व चौल भोवाळे यात्रेतील कचरा संकलन विशेषतः प्लास्टिक कचरा संकलनाच्या उपक्रमास पाठिंबा दर्शविला.या संकल्पनेस चौल ग्रामपंचायत व वनविभाग यांचे विशेष सहकार्य लाभले.निसर्ग ग्रुपच्यावतीने यात्रेच्या पहिल्याच दिवशी सर्व दुकानदाराना प्लास्टिक कचरा इतरस्त्र न टाकण्याचे आवाहन केले होते.कचरा संकलनासाठी मोठया पिशव्या उपलब्ध करून दिल्या होत्या.त्यानुसार रोजचा प्रत्येक दिवशी निर्माण होणारा कचरा सुयोग्यरितीने निसर्ग ग्रुप सदस्याच्या हाती सोपविला जात होता. पाच दिवसात निसर्ग ग्रुपने अंदाजे एक टन कचरा गोळा केला आहे.
या निसर्ग ग्रुपच्या संकल्पनेस साळाव जेएसडब्लू कंपनी सीएसआर विभागाचे अधिकारी मोहिते यांनी चौल भोवाळे येथील यात्रेत भेट दिली. यावेळी त्यांनी शैलेश राईलकर व राकेश काठे यांचेशी संवाद साधून सदर गोळा झालेल्या प्लास्टिक कचरा पुनर्निर्मितीसाठी पाठविण्याची हमी घेतली आहे.