| मुंबई | वृत्तसंस्था |
श्रीलंकेच्या स्टार बॅटरनं आणखी एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे. शतकासह वेगवेगळ्या विक्रमांची बरसात करत सप्टेंबर महिना गाजवणार्या या खेळाडूला आयसीसीचा ‘प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार’ जाहीर झाला आहे. मागच्या महिन्यातील कामगिरीच्या आधारावर आयसीसीने पुरुष गटातून ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कारचा तो मानकरी असल्याचे जाहीर केले.
जयसूर्या अन् ट्रॅविड हेडला धोबीपछाडआयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी मेंडिसशिवाय श्रीलंकन फिरकीपटू प्रभात जयसूर्या आणि ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ट्रॅविस हेड ही मंडळी शर्यतीत होती. पण त्यांना मागे टाकत मेंडिसनं मानाचा आणि प्रतिष्ठित पुरस्कारवर नाव कोरले. विशेष म्हणजे या वर्षात दुसर्यांदा त्याला हा पुरस्कार मिळाला आहे. 2024 या कॅलेंडर ईयरमध्ये दोन वेळा हा पुरस्कार मिळवणारा तो पहिला खेळाडूही ठरला आहे.
कामिंदू मेंडिस याने याआधी मार्चमध्ये या पुरस्कारावर नाव कोरले होते. आयसीसीकडून हा पुरस्कार पटकवणारा कामिंदू मेंडिस हा तिसरा श्रीलंकन खेळाडू आहे. याआधी प्रभात जयसूर्या आणि वानिंदू हसरंगा यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. मेंडिसनं या दिग्गजांना मागे टाकून दुसर्यांदा या पुरस्कारावर शिक्कामोर्तब केला आहे.