उरणकरांच्या आरोग्याशी खेळ

फळे, भाजीपाला धुण्यासाठी गटाराचे पाणी

| उरण | वार्ताहर |

उरण शहरातील परप्रांतीय फेरीवाले, हातगाडीवाले विक्रीसाठी आणलेली फळे-भाजीपाला धुण्यासाठी गटातील, रस्त्यावरील घाणीचे पाणी वापरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. तरी, उरणकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न करणार्‍या अशा परप्रांतीय फेरीवाल्यांवर, फळे-भाजीपाला विक्रेत्यांवर उरण नगरपरिषदेने कारवाई करावी, अशी मागणी महिलांकडून करण्यात येत आहे.

उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव यांचा धाक हा शहरातील हॉटेल, चायनीज पदार्थ आणि फळे भाजीपाला विक्रेत्यांवर राहिला नसल्याने अनेक व्यावसायिक हे भेसळ करून आपल्या पदार्थांची विक्री करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये वर्तवली जात आहे. त्यातच सोमवारी एका फळ भाजीपाला विक्रेत्याने आपल्या गाडीवरील खाद्य पदार्थ धुण्यासाठी गटातील रस्त्यावरील घाणीचे पाणी वापरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरी, उरणकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न करणार्‍या अशा विक्रेत्यांवर उरण नगरपरिषदेने कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी महिला करुन करण्यात येत आहे.

Exit mobile version