शासनाने लक्ष देण्याची सासवणे कोळी बांधवांची मागणी
। खारेपाट । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील सासवणे कोळीवाडा येथे मच्छीमारिकरिता जेट्टी नसल्याने मच्छीमार बांधवांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून प्रचंड हाल होत आहेत. सदरची जेट्टी व्हावी याकरीता अनेक वेळा संबंधित खात्याच्या अधिकारीवर्गाकडे निवेदन दिले आहे, बैठका झाल्या मात्र त्यावर काहीही कार्यवाही झाली नाही.
सासवणे कोळीवाडा परिसरात सुमारे पन्नासहून अधिक लहान-मोठ्या मच्छीमार नौका आहेत. या अनुषंगाने मंत्रीमहोदय व शासनाच्या अधिकार्यांनी सदरचा प्रश्न मार्गी लावावा. कारण जेट्टी नसल्याने समुद्रातून किनार्यावर येताना तराफार्यावर मच्छीमार बांधवाना कसरत करावी लागत आहे. यावर मंत्री महोदय, स्थानिक लोकप्रतिनिधी व संबधित खात्याच्या अधिकारी वर्गाने तातडीने लक्ष द्यावे अशी जोरदार मागणी श्री कापरी देवी मच्छीमार संस्था सासवणेचे अध्यक्ष सत्यवान कोळी व समस्त कोळी बांधवानकडून होत आहे.