एसटी बसेस वेळेवर सुटत नसल्यामुळे महिलांचे हाल

| चिरनेर | वार्ताहर |

पनवेल एसटी बस आगारातून चिरनेर, केळवणे, आवरे, पिरकोन, कोप्रोली तसेच या विभागातील अन्य गावात येणार्‍या एसटीच्या फेर्‍या कोरोना काळापासून कमी करण्यात आल्या आहेत. त्याही बसेस वेळेवर लागत सुटत नसल्यामुळे नियमित प्रवाशांचे प्रचंड हाल होत असल्याचे रायगड जिल्हा महिला संघाच्या अध्यक्षा जयवंती गोंधळी यांनी कृषिलवलच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. नियमीत प्रवास करणार्‍या महिला तसेच कॉलेज्यात शिक्षण घेणार्‍या मुली यांना पनवेल आगारात खूप वेळ थांबावे लागते. त्यामुळे नियमित प्रवासी महिलांची मोठी हेळसांड होत आहे.

आता शासनाने महिलांना 50 टक्के तिकिटाच्या दरात सर्वत्र प्रवासाची सवलत दिली आहे. त्यामुळे महिलांचा एसटी बसकडे ओढा वाढला आहे. मात्र पनवेल एसटी आगाराच्या अनागोंदी कारभारामुळे महिला प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.

चिरनेर, आवरे, केळवणे या गावांकडे प्रवास करण्यासाठी पूर्वी मोठ्या प्रमाणावर एसटी बक होत्या. मात्र कोरोना काळापासून या बसेस फारच कमी जात आहेत. मात्र याही एसटीबस वेळेवर लागत नसल्यामुळे आम्हा महिलांची मोठी गैरसोय होत आहे.

-जयवंती गोंधळी

Exit mobile version