माथेरानमध्ये पार्किंगसाठी मिळणार भूखंड; महसूल मंत्री बाळासाहेब यांचे निर्देश

। माथेरान । वार्ताहर ।
माथेरान हे सर्वांचे आवडते ठिकाण असून इथे मोठया प्रमाणावर पर्यटक येत असतात. स्वतःच्या वाहनाने येणार्‍या पर्यटकांना दस्तुरी नाक्यावर जागेअभावी खूपच अडचणी निर्माण होत असतात याकामी माथेरानच्या पार्किंग व्यवस्थेसाठी आवश्यक असलेल्या दस्तुरी नाका येथील एम.पी.93 हा भूखंड माथेरान पालिकेला हस्तांतरीत करण्याची महत्वपूर्ण मागणी माजी नगराध्यक्ष व माथेरान शहर काँग्रेसचे अध्यक्ष मनोज खेडकर यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना एम.पी. 93 ची पार्श्‍वभूमी समजावून सांगितली. कोकण आयुक्तांनी सदर भूखंड माथेरान पालिकेस हस्तांतरित करण्यात यावा अशी सूचना केली आहे.
मनोज खेडकर हे नगराध्यक्ष असताना सन 2008 मध्ये एम.पी. 93 हा प्लॉट वाडिया ट्रस्टच्या नावे होता मात्र तो खालसा झाला होता. सदर प्लॉट गाड्यांच्या पार्किंगसाठी माथेरान पालिकेला महसूल खात्याने द्यावा अशी मागणी केली होती. जिल्हाधिकारी विनायक निपुण यांनी तात्काळ कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. नगरविकास उपायुक्तांंनी एम.पी. 93 साठी वनविभागाचा अभिप्राय घेण्यात यावा असा शेरा मारल्याने ही फाईल वनखात्याच्या विविध खात्याकडे 13 वर्षानंतर कोकण आयुक्तांकडे आली आहे. महसूल विभागाच्या सचिवांकडून ती माथेरान पालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. माथेरान मधील काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने गावाच्या हिताच्या दृष्टिकोनातून महसूल मंत्र्यांची घेतलेली भेट अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. माथेरानची सध्याची पार्किंग व्यवस्था अत्यंत अपुरी पडते बर्‍याचदा गर्दीच्या वेळी वाहने घाटात उभी करावी लागतात एम.पी.93 हा साडेपाच एकरांचा भूखंड पालिकेस मिळाला तर अद्यावत पार्किंग व्यवस्था तयार होईल.
यावेळी रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत, जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष श्रध्दा ठाकूर, माजी नगरसेवक शिवाजी शिंदे, माथेरान शहर महिला अध्यक्ष वर्षा शिंदे, ज्येष्ठ नेते मिलिंद पाडगावकर, माथेरान काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष शुभम गायकवाड, हर्ष शिंदे,सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे आदी उपस्थित होते.

Exit mobile version