पीएनपी कॉलेजचे 21 व्या वर्षात पदार्पण

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील गोर गरीबांची मुलं उच्चशिक्षित झाली पाहिजेत, शिक्षण घेताना आर्थिकदृष्ट्‌‍या अडचणी येऊ नयेत या करिता खेडोपाड्यात आ. जयंत पाटील यांनी रायगडचे भाग्यविधाते स्व. प्रभाकर पाटील यांनी पाहिलेले स्वप्न अस्तित्वात उतरवले. पीएनपी एज्युकेशन सोसायटी विनाअनुदानीत दर्जेदार शिक्षण देणारी संस्था उभारली. आणि बघता बघता एक छोटेशे लावलेल्या रोपट्याचे एका वटवृक्षात रूपांतर झाले. पीएनपी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास 20 वर्ष पूर्ण होऊन कॉलेजचे 21 व्या वर्षात पदार्पण झाले. महाविद्यालयाचा वर्धापन दिन पीएनपी संकुलाच्या सभागृहात जल्लोषात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी कॉलेजचे संचालक विक्रांत वार्डे, प्रा. डॉ. ओमकार पोटे, प्रा. रविंद्र पाटील, मुख्याध्यापिका वेल्लईम्मल्ल, निसर्गा चेवले, सदाफ शाहबाजकर, शर्मिला शेट्ये, प्रा. नम्रता पाटील, प्रा. सुजित पाटील, प्रा. निशिकांत कोळसे, प्रा. दिनेश पाटील, प्रा. तेजस म्हात्रे, जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक, इतर मान्यवर, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिक्षणाची ज्ञानगंगा गोवोगावी पोहचवणारे पाटील कुटुंबियांचे मोलाचे योगदान आहे. स्थापना झाल्यापासून आज पर्यत पीएनपी महाविद्यालयाचा शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक दृष्ट्‌‍या आलेख दिवसेंदिवस वाढत चाललेला पाहत असताना आनंद वाटत आहे. अल्पावधीतच पीएनपी महाविद्यालय हे जिल्ह्यातील दर्जेदार शिक्षण देणारे एक महत्वाचे महाविद्यालय झालेले आहे असे डॉ. ओमकार पोटे यांनी सांगितले. प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी सुरांच्या जादूने तरुणाईची मनपसंद गाणी गाऊन मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमाचे अहवाल वाचन प्रा. नम्रता पाटील, सूत्रसंचालन प्रा. डॉ. रसिका म्हात्रे, प्रस्ताविक मिलिंद घाडगे तर आभार प्रा. दिनेश पाटील यांनी मानले.

महाविद्यालयाचा आलेख कायम चढता राहिला आहे. कॉलेजच्या जडणघडणीत ज्यांचे ज्यांचे योगदान आहे त्यांचे आभार मानून पीएनपीचे नावलौकिक गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहचले आहे. मुंबई विद्यापीठात अनेक विद्यार्थ्यांनी नावलौकिक कायम अबाधित ठेवले आहे. हर्षल पाटील यास मॉरिशिअसच्या पंतप्रधानांसमोर गीत गाण्याचे भाग्य लाभले. महाविद्यालय हे कायम विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे असणार आहे.

विक्रांत वार्डे, पीएनपी कॉलेज संचालक
Exit mobile version