। अलिबाग । प्रतिनिधी ।
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य व अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी शनिवारी (दि.21) एचडीएफसी बँकेला भेट दिली.
बँकेमध्ये कार्यरत असणार्या विविध विभागांद्वारे विद्यार्थ्यांना बँकेचा व्यवहार कळावा यासाठी बँक भेटीचे प्रयोजन वाणिज्य विभाग व अर्थशास्त्र विभागातून केले गेले. याप्रसंगी ब्रँच मॅनेजर निलेश मोरे व त्यांचे सहकारी मयुर त्रिभुवन, निलेश मोरे, पूर्वा वेरनेकर यांनी बँकेमध्ये चालणारे रोजचे व्यवहार तसेच वेगवेगळ्या प्रकारचे लोन, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इन्शुरन्स याविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. ऑनलाइन बँकिंग सिस्टीम कशी चालते, याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्यामध्ये असणारे धोके समजावून सांगितले आणि विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसनही केले. ब्रँच मॅनेजर यांनी विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रामध्ये असलेले करियर व त्यासाठी लागणारी तयारी याविषयी सुद्धा मार्गदर्शन केले. बँक भेटीसाठी वाणिज्य व अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थी तसेच प्रीती पाटील, प्राची वैद्य, सुजैन बेलोस्कर उपस्थित होत्या. सदर बँक भेटीसाठी वाणिज्य विभाग व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रसिका म्हात्रे यांनी विशेष सहकार्य केले.