| अलिबाग | प्रतिनिधी |
प्रभाकर पाटील एज्यूकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील कला विभागांतर्फे तृतीय वर्ष भूगोल विद्यार्थ्यांसाठी संशोधन सर्वेक्षण आयोजन (दि.7) मार्च रोजी करण्यात आले होते.
खंडाळे गावातील लोकांचा सामाजिक व सांस्कृतिक दृष्टीकोनातून अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः घरोघरी जाऊन प्रश्नावली व मुलाखत घेऊन माहिती संकलित केली. सदर संशोधन सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना सहा. प्रा नितीन करळे, सहा. प्रा संजना पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, कला विभाग प्रमुख डॉ. नम्रता पाटील, प्रा. मिलिंद घाडगे, या प्रसंगी खंडाळे गावचे ग्रामविकास अधिकारी, प्रथम नागरिक तसेच गावातील सर्वांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले.







