। अलिबाग । प्रतिनिधी ।
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वनस्पती शास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र व प्राणीशास्त्र विभागातर्फे चरपर्सीेींश उशश्रश्र, महाराष्ट्र वनविभाग अलिबाग यांच्या संयुक्तमानाने भारतात चित्यांची पुनरावृत्ती या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
पर्यावरणाच्या हितासाठी, सजीव सृष्टी सुरक्षित व त्यांचे जतन करणे आवश्यक आहे. याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी (17) सप्टेंबर रोजी कुनो नॅशनल पार्क, शेवपूर,मध्य प्रदेश येथे भारतात चित्यांची पुनरावृत्ती ह्या प्रोजेक्टचे उद्घाटन प्रतपंधानाच्या हस्ते होणार आहे. या प्रोजेक्ट बद्दल सर्व नवीन पिढीला व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र वन विभाग अलिबागचे कर्मचारी, पीएनपी महाविद्यालयात व्याख्यान देण्यासाठी आले होते.
शुभम कणुरे यांनी विद्यार्थ्यांना चित्ताच्या जाती नष्ट होण्याचे कारण आणि पुन्हा परिचय करण्यासाठी सरकारने केलेला प्रोजेक्ट याबद्दल सांगितले. महाराष्ट्र वन विभाग रायगड यांचे कर्मचारी स्वाती महाले, निमिषा नारकर,विराज दाभोळकर, बालाजी वाघमारे, प्रभारी प्रा. डॉ. ओमकार पोटे, विक्रांत वार्डे तसेच विज्ञान विभागाचे प्रा. रवींद्र पाटील, प्रा. तन्मय पाटील, प्रा. तेजश्री तांबे, प्रा. पूजा पाटील, प्रा. सिद्धार्थ मोकल, प्रा. पल्लवी पाटील, व 34 विद्यार्थी उपस्थित होते. सर्व उपस्थित मान्यवराचे, शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे स्वागत व आभार प्रदर्शन प्रा. अपूर्वा पाटील यांनी केले.