सुप्रिया पाटील यांची प्रमुख उपस्थिती
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. 20) रोजी चौथ्या दिवशीच्या सामन्यांचे उद्घाटन झाले. अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, पीएनपी इन्फ्राचे संचालक नृपाल पाटील, यु.व्ही स्पोर्ट्स ॲकेडमीच्या संचालिका चित्रलेखा पाटील, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, बेलकडेचे सरपंच संजय पाटील, कावीरचे सरपंच राजेंद्र म्हात्रे, कुरुळचे माजी उपसरपंच ॲड. मनोज ओव्हाळ, पुरोगामी युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे, संघ मालक, खेळाडू यावेळी उपस्थित होते. गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या या महासंग्रामाला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. आयपीएलच्या धर्तीवर सुरु असलेल्या या खेळाचा आनंद अलिबागकरांसह संपुर्ण जिल्ह्यातील क्रिडा प्रेमींनी घेतला.
उद्घाटनीय सामना आझाद इलेव्हन कुरुळ व अक्षय्या हॉटेल 11 या संघात झाला. अक्षय्या हॉटेल्स संघाने नाणे फेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. कुरुळ संघाने सुरुवातीला फलंदाजी करीत पहिल्या तीन षटकात 28 धावा केल्या.त्यानंतर उर्वरित दोन षटकात 40 धावा करीत एकूण पाच षटकात 68 धावा केल्या. अक्षया हॉटेल समोर जिंकण्यासाठी 69 धावांचे लक्ष्य होते. या संघाने 4.1 षटकात 72 धावा करीत विजय मिळविला.
तिसऱ्या दिवसाचे आदल्या दिवशी सोमवारी दुपारी एक वाजल्यापासून सामने सुरु झाले. डे – नाईट झालेल्या स्पर्धेत हा सामने खेळविण्यात आले. त्यामध्ये प्रांशी इलेव्हन रोहा आणि ए. बी. ग्रुप अलिबाग या दोन संघामध्ये सामने झाले. रोहा संघाने पाच षटकात 57 धावा केल्या होत्या. अलिबाग संघासमोर जिंकण्यासाठी 60 धावांचे लक्ष्य होते. या संघातील खेळाडूने दमदार फलंदाजी करीत लक्ष्य पूर्ण करू विजय मिळविला. या संघातील खेळाडू प्रज्वल ठाकूर याला सामनावीर म्हणून बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
श्रावणी स्पोर्ट्स चौल आणि रेड हॉर्स 11 नवगाव संघात झालेल्या सामन्यात सुरुवातीला फलंदाजी करीत चौलमधील संघाने 59 धावा केल्या. नवगाव संघाने विजयासाठी लक्ष्य पुर्ण करण्याचा प्रयत्न केला. परंतु 56 धावांवर त्यांना समाधान मानावे लागले. त्यामुळे श्रावणी स्पोर्ट्स चौल संघ जिंकला. अजिंक्य वैद्य हा खेळाडू सामनावीर ठरला.
यशश्री बिल्डींग कंस्ट्रक्शन थेरोंडा आणि नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर या संघात सामना झाला. त्यामध्ये सुरुवातीला साखर संघाने फलंदाजी केली. पाच षटकात या संघाने 70 धावा केल्या. त्यानंतर थेरोंडा येथील संघाच्या खेळाडूंनी फलंदाजीला सुरुवात केली. 4.5 षटकात त्यांनी 74 धावा करीत विजय मिळविला. या सामन्यातील सामनावीर अजय चौलकर ठरला. जिजा अंश इलेव्हन आणि सुपर स्पेअर्स आंबेपूर संघात झालेल्या सामन्यामध्ये जिजा अंश संघाने क्षेत्ररक्षण स्विकारले. एसपी आंबेपूर संघाने फलंदाजी केली. त्यांनी पाच षटकात 69 धावा केल्या. जिजा अंश संघाने 4.5 षटकात 70 धावा करीत हा सामना जिंकला.त्यामध्ये सामनावीर मंदार म्हात्रे ठरला.
ए.बी. ग्रुप अलिबाग आणि श्रावणी स्पोर्ट्स चौल संघात झालेल्या सामन्यात सुरुवातीला चौलमधील संघाने फलंदाजी केली. पाच षटकात त्यांनी 69 धावा केल्या. अलिबाग संघासमोर जिंकण्यासाठी 70 धावांचे लक्ष्य होते. मात्र त्या लक्ष्यापर्यंत अलिबाग संघाला पोहचता आले नाही. त्यांनी फक्त 66 धावा केल्या. त्यामुळे चौलमधील संघ विजयी ठरला असून सामनावीरचा बहूमान आकाश तवसाळकरला देण्यात आला. प्रांशी इलेव्हन रोहा आणि रेड हॉर्स इलेव्हन नवगाव संघात सामना झाला. रोहा संघाने पाच षटकात 63 धावा केल्या. नवगाव संघाला जिंकण्यासाठी 64 धावांचीगरज होती. परंतु त्यांना ते करणे शक्य झाले नाही. 34 धावांमध्ये नवगाव संघाला समाधान मानावे लागले. या स्पर्धेतील सुराग हा सामनावीर ठरला. त्यांने दहा चेंडूत 35 धावा केल्या. यशश्री बिल्डींग कंस्ट्रक्शन थेरोंडा आणि जिजा अंश इलेव्हन संघात लढत झाली. जिजा संघाने 62 धावा केल्या. थेरोंडा संघाला जिंकण्यासाठी63 धावांची आवश्यकता होती. परंतु थेरोंडा संघाला 56 धावांमध्ये समाधान मानावे लागले. त्यामुळे जिजा संघ विजयी ठरला असून ओमकार पाटील याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर आणि सुप प्लेअर्स आंबेपूर या संघामध्ये सामना झाला. त्यामध्ये सुरुवातीला फलंदाजी करीत पाच षटकात 93 धावा केल्या. नाखवा संघाला जिंकण्यासाठी 94 धावांचे लक्ष्य होते. परंतु फक्त 50 धावांमध्ये हा सामना उरकल्याने आंबेपूर संघ विजयी झाला. प्रसाद राऊत याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. ए.बी. ग्रुप अलिबाग आणि प्रांशी इलेव्हन रोहा या संघामध्ये सामना झाला. प्रांशी इलेव्हन संघाने 72 धावा केल्या. जिंकण्यासाठी अलिबाग संघ शर्तीचे प्रयत्न करीत होते. परंतू 55 धावांमध्येच हा खेळ उरकल्याने रोहा संघ विजयी झाला. सामनावीर म्हणून रोहन सानवे ठरला. यशश्री बिल्डींग कंस्ट्रक्शन थेरोंडा आणि सुपर प्लेअर्स आंबेपूर संघाच्या सामन्यात थेरोंडा संघाने पाच षटकात 65 धावा केल्या.आंबेपूर संघाला हा सामना जिंकण्यासाठी 66 धावांचे लक्ष्य होते. मात्र 56 धावांमध्येच हा सामना उरकण्यात आल्याने थेरोंडा संघ विजयी झाला. ओमकार पाटील याला सामनावीरचा सन्मान देण्यात आला. गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या सामन्यांचा आनंद लुटण्यासाठी प्रेक्षकांनी अलोट गर्दी केली. काहींनी युटयूबद्वारे स्पर्धा पाहण्याचा आनंद घेतला.