पीएनपी चषक! सुरेश काका इलेव्हन संघ ठरला अंतिम विजेता

रायगडात ठरली नंबर वन स्पर्धा; आ. जयंत पाटील यांच्या हस्ते विजेत्या संघाचा गौरव

| अलिबाग | प्रतिनिधी |

स्व. प्रभाकर पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना पुरस्कृत यू. व्ही. स्पोर्टस्‌‍ अकादमी आयोजित पीएनपी चषक 2024 डे-नाईट क्रिकेट स्पर्धेला गेल्या पाच दिवसांपासून अलिबागमधील कुरुळ येथील आझाद मैदानावर अंतिम सामन्याच्या ऐतिहासिक चषकांचा सुपर ओव्हरने समारोह बुधवार (दि.21) फेब्रुवारी रोजी हजारों क्रिकेट रसिकांच्या साक्षीने पाहायला मिळाला. या स्पर्धेत क्रिकेट चाहत्यांना पहिल्यांदाच सुपर ओव्हर पाहायला मिळाली. चौकार-षटकांची आतषबाजी पाहयला मिळाल्यामुळे ही स्पर्धा ऐतिहासिक ठरली.


शनिवारी (दि.17) ते बुधवार (दि.22) या पाच दिवसाच्या कालावधीत हे सामने घेण्यात आले. या स्पर्धेतील अंतिम विजेता सुरेश काका 11 वरसोली संघ ठरला असून या संघाला पाच लाख रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. आ. जयंत पाटील यांच्या हस्ते या विजेत्या संघाचा सन्मान चषक देऊन करण्यात आला. गेल्या पाच दिवसांपासून कुरुळ येथील आझाद मैदानात क्रिकेटचा थरार रंगला. या स्पर्धेमध्ये एकूण 24 संघांनी सहभाग घेतला होता. सुपर सिक्समध्ये सहा संघाची निवड झाली. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी अंतिम लढत मुस्कान 11 मांडला, प्रदिप स्पोटर्स साखर, रोहांशू 11 केतकीचा मळा, प्रांशी 11 रोहा, ज्ञानी11 नांगरवाडी आणि सुरेश काका 11 वरसोली संघामध्ये झाली. अंतिम सामना प्रदिप स्पोटर्स साखर आणि सुरेश काका 11 वरसोली या संघामध्ये झाला.


वरसोली संघाने सुरुवातीला फलंदाजी करीत सहा षटकात 52 धावा केल्या होत्या. साखर संघाला जिंकण्यासाठी 53 धावांचे आव्हान होते. परंतू ही लढत चुरशीची झाली. साखर संघाचे खेळाडू फलंदाजी दमदार करीत असताना वरसोली संघाची गोलदांजी क्षेत्ररक्षणीदेखील उत्तम करीत होते. ही लढत एकतर्फी वाटत असताना, हा सामना बरोबरीचा झाला. त्यामुळे खेळाची रंगत अधिक वाढली. पुन्हा एका षटकाची सुपर ओव्हर घेण्यात आली. साखर संघाने फलंदाजी स्वीकारली. एका षटकात एक बाद आठ धावा केल्या होत्या. वरसोली संघासमोर एका षटकात 9 धावांचे लक्ष्य होते. मात्र सुरुवातीलाच वरसोली संघातील कप्तान शिरू विकला बाद केल्याने वरसोली संघासमोर आव्हान अधिक उभे राहिले. अखेर वरसोली संघातील अक्षयने उत्तम फलंदाजी करीत वरसोली संघाला हा विजय मिळवून दिला.


वरसोली संघ पीएनपी चषकाचा मानकरी ठरल्याने मोठा जल्लोष करण्यात आला. फटकांच्या आतषबाजी, करीत हा विजयोत्सव साजरा केला. सुरेश काका इलेव्हन वरसोली संघाला चषक व रोख पाच लाख रुपये असे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. प्रदिप स्पोटर्स साखर संघाला द्वीतीय क्रमांकाचे चषक व तीन लाख रुपये तसेच तृतीय क्रमांकाचे चषक व रोख दोन लाख रुपयांचे पारितोषिक रोहांशू इलेव्हन केतकीचामळा या संघाला देऊन गौरविण्यात आले. आ. जयंत पाटील, अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, पीएनपी इन्फ्राचे संचालक नृपाल पाटील, यु.व्ही स्पोर्ट्स ॲकेडमीच्या संचालिका चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते या विजेत्या संघाचा गौरव करण्यात आला.


यावेळी माजी आ. पंडित पाटील,रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा तथा अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, पीएनपी इन्फ्राचे संचालक नृपाल पाटील, शैला पाटील, यु.व्ही स्पोर्ट्स ॲकेडमीच्या संचालिका चित्रलेखा पाटील, ॲड. राजन पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्या भावना पाटील, ॲड. निता पाटील, निनाद पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य द्वारकानाथ नाईक, अलिबाग नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, माजी नगरसेवक अनिल चोपडा, शिंदे गटातील पिंट्या ठाकूर, अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद ठाकूर, प्रकाश पाटील, माजी सदस्य श्रीधर भोपी, बेलोशी ग्रामपंचायतीचे सदस्य गिरीश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य भास्कर भोपी, वैद्यकिय, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, पनवेल, पेण, खालापूर, कर्जत, उरण, श्रीवर्धन, म्हसळा, माणगांव, सुधागड, तळा, पोलादपूर, महाड व रोहा येथील तालुका चिटणीस, आदी सर्व मान्यवरांसह महानगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद,नगरपालिका,पंचायत समिती, ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी, सदस्य, नगरसेवक, कार्यकर्ते, प्रेक्षक, संघ मालक, खेळाडू उपस्थित होते.

हे ठरले स्टार
पहिल्या उपांत्यफेरीमधील सामनावीर प्रदिप स्पोटर्स साखरमधील खेळाडू उमेश घाणेकर.
पहिल्या उपांत्यफेरीमधील सामनावीर सुरेश काका इलेव्हन वरसोलीसंघातील खेळाडू शिरू विक.
अंतिम सामन्यातील सामनावीर सुरेश काका इलेव्हन वरसोली संघातील खेळाडू अक्षय पाटील.
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून प्रांशी इलेव्हन रोहा संघातील तुषार कांबळी.
नवोदित उत्कृष्ट क्रिकेटपट्टू ज्ञानी इलेव्हन नांगरवाडी संघातील भुषण झावरे
सर्वाधिक चौकार मारणारा सुरेश काका इलेव्हन वरसोली संघातील शिरू विक
सर्वाधिक षटकार मारणारा मुस्कान इलेव्हन मांडला संघातील हुसेन टाकी
उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सुरेश काका 11 वरसोली संघातील किशोर नाईक
उत्कृष्ट फलंदाज म्हणून प्रदिप स्पोटर्स साखर संघातील निखील धारवे.
उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून प्रांशी इलेव्हन रोहा संघातील सुराग दाभाडे.
मालिकावीर म्हणून सुरेश काका इलेव्हन वरसोली संघातील शिरू विक.

अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील आझाद मैदानात गेल्या पाच दिवसांपासून पीएनपी चषक 2024 या टेनिस क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील अंतिम सामन्यानंतर वेगवेगळ्या खेळाडूंना वैयक्तीक बक्षीसे देण्यात आली. वरसोली संघातील शिरू विक या खेळाडूला मालिकावीरचा बहूमान देण्यात आला. त्यावेळी त्याला दुचाकी व भारतीय क्रिकेट संघातील माजी कर्णधार रवी शास्त्री यांनी सही केलेली बॅट बक्षीस म्हणून देण्यात आली. तसेच प्रदिप स्पोटर्स साखर संघातील निखील धारवे या खेळाडूचा उत्कृष्ट फलंदाज म्हणून सन्मान करताना त्याला दुचाकी आणि भारतीय क्रिकेटपट्टू श्रेयस अय्यर यांनी सही केलेली बॅट देण्यात आली. या खेळाडूंचा सन्मान पीएनपी इन्फ्राचे संचालक नृपाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. अनेक खेळाडूंना एलईडी टीव्ही, स्मार्ट वॉच देऊन गौरविण्यात आले.

पहिल्यांदा बाईक भेटल्याचा आनंद
मी आदिवासी समाजातील असून सुरेश काक इलेव्हन वरसोली संघात खेळण्याची संधी सुरेश घरत यांच्यामुळे मिळाली. गेल्या पाच दिवसात एक वेगळ्या खेळाचा आनंद मिळाला आहे. पीएनपी चषक स्पर्धेतून मला दुचाकी बक्षीस मिळाल्याचा आनंद आहे. कारण माझ्याकडे गाडी नव्हती. पीएनपी चषकामार्फत मला गाडी मिळाली. त्यामुळे खूप समाधानी आहे, असे उत्कृष्ट गोंलदाजचा किशोर नाईक म्हणाले.
प्रभाकर पाटील यांना आगळीवेगळी आदरांजली
रायगडचे भाग्यविधाते, शेतकरी, कष्टकरी, कामगार व गोरगरीबांचे कैवारी प्रभाकर पाटील तथा भाऊ यांच्या स्मृतीदिनानिमित्त कुरुळ येथील आझाद मैदानात एक आगळी वेगळी आदरांजली देण्यात आली. अंतिम सामना सुरु होण्यापूर्वी भाऊंच्या कार्याची माहिती चित्रफितीमार्फत दाखण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवर, प्रेक्षक, संघ मालक, खेळाडूंनी त्यांच्याकडील मोबाईलच्या प्रकाश झोतात भाऊंना मानवंदना देण्यात आली.
Exit mobile version